
रिझर्व्ह बँकेने 2,000 च्या नोटा रद्द केल्यानंतर दोन वर्षांनंतरही 6,266 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही बाहेर आहेत. आरबीआयने शेअर केलेल्या अधिकृत आकडेवारीतून ही बाब अधोरेखित होते. 19 मे 2023 रोजी आरबीआयने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. 19 मे 2023 रोजी व्यवहार बंद होताना 2000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते, जे 30 एप्रिल 2025 रोजी व्यवहार बंद होताना कमी होऊन 6.266 कोटी रुपये झाले, असे आरबीआयने म्हटले. एकूणच 2023 मध्ये चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी 98.24 टक्के नोटा परत करण्यात आल्या आहेत, असे आरबीआयने स्पष्ट केले. अशा नोटा जमा करण्याची अथवा बदलण्याची सुविधा 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत सर्व बँक शाखांमध्ये उपलब्ध होती. तर ही सुविधा अद्यापही आरबीआयच्या 19 कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे.