केंद्र आणि राज्य सरकारने धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली धारावीकरांना हुसकावून लावण्याचा डाव आखला असताना आता धारावी प्रकल्पासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीची 21 एकर जागा अदानीच्या घशात घालण्याचे सरकारी फर्मान काढले आहे. त्यासाठी कोणतीही टेंडर प्रक्रिया राबवलेली नाही. कोटय़वधी रुपये किमतीची ही मोक्याची जागा नाममात्र दराने अदानीला बहाल केली असून हा एक महाघोटाळा असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा-खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
कुर्ला येथील मदर डेअरीच्या जमिनीबद्दल माहिती देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, मोदानी अॅण्ड पंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची भूमिका भाजप सरकारने घेतलेली आहे. जी जमीन सरकारी आहे, ती जमीन अदानीची असा प्रकार सुरू आहे. भाजप सरकारने अदानीसाठी धारावी टेंडर आणि टीडीआर महाघोटाळा केला आणि धारावीकरांचा हक्क मारण्याचा कट रचला. नंतर धारावी पुनर्वसनाच्या नावाने पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील असणाऱया मिठागरांच्या जमिनी व पूर्वी जकात नाक्यासाठी असलेली मुलुंड येथील महापालिकेची जागा आणि डंपिंग ग्राऊंडची जागा लुबाडण्याचा डाव मांडला. आता पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील असणारी कुर्ला येथील मदर डेअरीची जागा यांना गिळून टाकायची आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदानीला नाममात्र दराने हा भूखंड भेट देण्याचा डाव हाणून पाडू, असा इशारा
अदानीला धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी हवी ही जागा
या आधीही भाजपच्याच एका उच्चपदस्थ नेत्याचा डोळा या भूखंडावर पडला होता आणि या जागी औद्योगिक संकुल उभारण्याचा खेळ मांडला होता. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परममित्र अदानीची नजर या भूखंडावर पडली आहे. एकनाथ शिंदेंच्या पूर्वीच्या आदेशांना केराची टोपली दाखवत महसूल व दुग्धविकास विभागाने ही जागा अदानीच्या ‘डीआरपीपीएल’ पंपनीला भेट देण्याचा जीआर काढला आहे.
भूखंडावर सार्वजनिक उद्यान उभारा!
मदर डेअरीने पूर्वी वापरलेल्या कुर्लाच्या भूखंडावर 800 ते 900 मौल्यवान झाडे आहेत, ज्यांच्यामुळे इथला परिसर हा पर्यावरणपूरक आणि संवेदनशील आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व इथल्या रहिवाशांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी हा संपूर्ण भूखंड सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित करण्यात यावा यासाठी स्थानिकांनी एक लोकचळवळ उभारली आहे. या मागणीला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.