नेपाळमध्ये मृत पावलेल्या 25 भाविकांचे मृतदेह विमानाने महाराष्ट्रात आणणार, प्रशासनाची माहिती

नेपाळमध्ये बसला अपघात होऊन महाराष्ट्रातल्या 25 जणांचा मृत्यू झाला होता. आता या सर्व भाविकांचे मृतदेह विमानाने महाराष्ट्रात आणले जाणार आहेत.

नेपाळमध्ये झालेल्या अपघातात चालक मुर्तझा आणि कंडक्टर रामजीत यांचाही मृत्यू झाला होता. दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असून त्यांचे मृतदेह त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले आहे.


या अपघातात 51 प्रवासी बचावले आहेत. सर्व प्रवाशांना गोरखपूरमध्ये आणले असून त्यांच्यासाठी खाण्या पिण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या प्रवासासाठी गाडी आणि रुग्णवाहिकेचीही सोय करण्यात आली आहे. मृत पावलेल्या भाविकांवर नेपाळमध्ये शवविच्छेदन होईल, त्यानंतर त्यांचे मृतदेह विमानाने नेपाळहून महाराष्ट्रात विमानाने आणले जाईल.