बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू, 12 जणांना अटक

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये दारूबंदी असूनही बेकायदेशीररित्या दारू विकली जाते. विषारी दारू प्यायल्यामुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिवान जिल्ह्यात 20 तर छपरा जिल्ह्यात 5 जणांचा विषारी दारुमुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

 

मंगळवारी गावातल्या काही लोकांनी ही दारू प्यायली आणि त्यांची तब्येत बिघडली. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तपास सुरू केला आहे. तसेच महसूल विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.