लडाखमध्ये आयटीबीपीच्या 29 नव्या चौक्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘गलवान’ संघर्षांनंतर हिंदुस्थानने आपल्या सीमांवर पाळत वाढवली आहे. याचाच एक भाग म्हणून भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) ची गस्त वाढवली असून लडाखमधील चीन सीमेवर 29 नवीन चौक्या उभारण्यात आल्या आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवर अँटी-ड्रोन, सेन्सर आणि लेझरच्या मदतीने पाळत सुरू करण्यात आली आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरील जम्मू प्रदेशात आणि हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवरील आसाममधील धुब्री येथे प्रत्येकी 5-5 किमी परिसरात ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टम’चे दोन प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.