चालकाला झोप लागल्याने अपघात, ३ जणांचा मृत्यू

राज ठाकूर, माहूर

माहूर तालुक्यातील गोंडवडसा या गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सगळेजण यवतमाळ जवळील उमेरखेड इथले रहिवासी आहेत असून पहाटे ३ वाजता ही दुर्घटना घडली आहे. हे सगळे जण तेलंगणा राज्यातील पटनापूर येथूल फुलाजी बाबांच्या दर्शनासाठी जात होते. नर्मदा धुलाजी बोंबले (वय-४५),रूख्माबाई केशव वंजारे (वय -५५) आणि बाळू श्रीराम साबळे(वय-३५) अशी मृतांची नावे आहेत.

महींद्रा कंपणीच्या बोलेरो पिकअप व्हॅनमधून एकूण १४ जण प्रवास करीत होते. चालकाला डुलकी लागल्याने ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर आदळली. अपघातात जखमी झालेल्या ११ जणांवर माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या