कोपरगाव : कोल्हापूर, सांगलीच्या मदतीसाठी 48 टन किराणाचे 3 ट्रक रवाना

382

स्वतः पूरग्रस्त असतानाही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून येथील कोपरगाव तालुका किराणा मर्चंट,  व्यापारी,  महिला महासंघ,  बुलढाणा जिल्हा अर्बन क्रेडीट सोसायटी,  राज्य पतसंस्था फेडरेशन व भाग्यलक्ष्मी पतसंस्था,  मालेगाव,  सहायक निबंधक कार्यालय सह शहरातील विविध संस्था,  प्रतिष्ठीतांनी एकत्रित येऊन गोळा केलेली तब्बल ४८ हजार ६०० किलो किराणा माल , शालेय उपयोगी साहित्य कपडे भरलेले तीन ट्रक मदत बुधवारी (२१) दुपारी सांगली कोल्हापूर जिल्हातील पूरग्रस्तांना रवाना करण्यात आले.  नायब तहसीलदार प्रतिभा कुलकर्णी यांनी हिरवा झेंडा दिला.

एका कुटुंबास एक महिन्याला पुरेल असे निवडक व ब्रांडेड किराणा साहित्य असलेले २७ कि. ग्रामची एक किट अश्या १८०० कीट वरील संस्थासह शहरातील विविध सामाजिक संस्था, व्यक्ती यांनी मदत म्हणून देत आपले दातृत्व दाखवले. समता चँरीटेबल ट्रस्ट , समता, व्यापारी,  महिला आदींनी रात्रंदिवस कष्ट घेऊन हे सर्व पँकिंग केल्या. तब्बल २१ लाख रुपयांचे साहित्य असलेले हे सर्व सामान भिलवडी ग्रामपंचायतील ८४० कुटुंबे, वर्सोड ७०,  ब्रम्हनाळ २४९,  बुर्ली २५० व खटाव येथील २६५ अश्या १६७४ कुटुंब व ७५९८ व्यक्तींच्या घरोघर जावून हि पोहच केली जाणार आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनच्या सहाय्याने सांगली,  कोल्हापूर जिल्ह्यातील नेटवर्क,  शहरातील सामजिक कार्यकर्ते यांची सामान वाटपासाठी मोलाची मदत घेणार असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे माजी पक्ष प्रतोद केशव भवर यांनी ही संकल्पना मांडली. त्यास कोयटे व सर्वांनी मूर्त स्वरूप दिले. पूरग्रस्तांना मदत मागण्यासाठी कोणाच्या दारात आम्हाला जावे लागले नाही केवळ फोन वर ही मदत गोळा झाली,  असे व्यापारी संघाचे अध्यक्ष सुधीर डागा यांनी सांगितले. सलग चार दिवस चाळीस कर्मचारी हे पकिंग करीत होते. टक्सी , ड्रायव्हर चालक संघटनेच्या सहा सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने हि मदत वाटप करण्यास मदत करण्यची तयारी दाखवली. ट्रक रवाना करतेवेळी जेष्ठ व्यापारी मोहन झंवर,  राजकुमार बंब,  कैलास ठोळे,  रवींद्र बोरावके,  कान्तीलाल जोशी, संजय भन्साळी,  दीपक विसपुते, केशव भवर, चांगदेव शिरोडे, सुहासिनी कोयटे, किरण दगडे,  किरण डागा , रुपाली अमृतकर,  तुलसीदास खुबानी, तुरुंगाधिकारी रवींद्र देशमुख,  सहायक निबंधक कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

२७ किलोच्या पकिंगमध्ये

१० किलो गव्हाचे पीठ, ५ किलो तांदूळ,  तुरडाळ, शेंगदाणे, साबुदाणा प्रत्येकी एक किलो, गोडतेल, साखर दोन किलो मिरची,  हळद,  धना,  जिरे,  मोहरी,  हिंग,  बेसन , मीठ, काळा मसाला असा तब्बल १७ वस्तूंचा २७ किलोंच्या पकिंगमध्ये समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या