
मणिपुरच्या इंफाळ खोऱ्यात चिरांग नदीकाठी वैज्ञानिकांना एक थक्क करणारा शोध लागला आहे. तब्बल 37,000 वर्षे जुना काटेरी बांबूचं जीवाश्म वैज्ञानिकांना सापडले. या जीवाश्मावर प्राचीन काटयांचे निशाण अतिशय स्पष्ट दिसत आहेत. हे आशियातील आतापर्यंत सापडलेले सर्वात जुने काटेरी बांबूचा जीवाश्म आहे. हे बांबू हिमयुगातील आहे, जेव्हा पृथ्वीवर प्रचंड थंडी होती. त्यावेळी युरोपसह जगातील अनेक भागांतून बांबू पूर्णपणे नामशेष झाले होते, पण मणिपूर आणि ईशान्य हिंदुस्थानात ते टिकून होते. याचे कारण म्हणजे उष्ण आणि दमट हवामान.

























































