भुतानमध्ये 4.2 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही; पुन्हा भुकंप होण्याची शक्यता

भुतानमध्ये 4.2 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. हा भूकंप जमिनीखालून केवळ 10 किमी उथळ खोलीवर झाला, ज्यामुळे आफ्टरशॉक्स म्हणजेच पुन्हा धक्के बसण्याची शक्यता अधिक आहे.

उथळ भूकंप हे खोल भूकंपांपेक्षा अधिक धोकादायक असतात. कारण उथळ भूकंपाचे भूकंपीय तरंग जमिनीवर पोहोचण्यासाठी कमी अंतर पार करतात, ज्यामुळे जमिनीचा हादरा अधिक तीव्र होतो आणि इमारतींना जास्त हानी तसेच जास्त प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता वाढते.

भूतानलाही इतर जगाप्रमाणे नैसर्गिक आपत्तींच्या प्रकोपापासून वाचता आलेले नाही. विविध आपत्तींचा धोका या देशाला आहे. भौगोलिकदृष्ट्या, भूतान हिमालयाच्या तरुण पर्वतरांगांमध्ये वसलेले असून, जगातील सर्वाधिक भूकंपीय सक्रिय भागांपैकी एक मानले जाते, असे आशियन डिसास्टर रिडक्शन सेंटरने नमूद केले आहे.