या मोसमात फक्त या 4 फॅब्रिकचे कपडे परिधान करा, मिळेल पूर्ण आराम

पावसाचे वेध लागले तरी उन्हाची काहिली काही कमी होत नाही. आपण या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय करतो. यामध्ये एसी, कूलर, हेल्दी ड्रिंक्स आणि डाएटपर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय आणखी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे कपडे. या ऋतूत गडद रंगाचे कपडे घालणे टाळले जाते. याशिवाय, लोक अशा फॅब्रिकचे कपडे शोधतात जे परिधान केल्यानंतर आरामदायक वाटेल. अशा कपड्यांपासून बनवलेले पोशाख परिधान केल्याने उन्हाळा नक्कीच सुखद होईल.

सुती कपडे-
उन्हाळ्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हे कापड खूप हलके असल्याने हवेचा त्वचेशी संपर्क राहतो. उन्हात घाम आला की आरामात सुकते. याच्या मदतीने तुम्ही खाज, पुरळ आणि घामोळ्यांची समस्या टाळू शकता. या फॅब्रिकचे कपडे उन्हाळ्यात सर्रास परिधान केले जातात.

लिनन-
तुम्ही लिननचे कपडेदेखील उन्हाळ्यात घालू शकता. हे कापड त्वचेला अनुकूल असते. ते खूप हलके असते. या फॅब्रिकमध्ये सूट, साड्या आणि कुर्ते खूप सुंदर मिळतात.

होजियरी-
हे कापड मिक्स फॅब्रिकपासून बनवले जाते. ते खूप पातळ असते. या सोबतच ते खूप स्ट्रेचेबल असते. हे शरीराच्या कोणत्याही प्रकारासाठी योग्य आहे. उन्हाळ्यात तुम्ही होजियरीचे बनवलेले कुर्ते, टी-शर्ट आणि शॉर्ट्स घालू शकता.

रेयॉन-
रेयॉन फॅब्रिक उन्हाळ्यासाठी चांगले आहे. ते सिल्कसारखे दिसते. पण ते सिल्कपेक्षा हलके आणि पातळ असते. तुम्ही उन्हाळ्यात रेयॉनचे कपडे, कुर्ती आणि शर्ट घालू शकता. त्यात तुम्हाला आरामशीर वाटेल.