
आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश तसेच बांगलादेशमध्ये झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये 48 जणांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशच्या मरकापुरम जिह्यात आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास एक खासगी ट्रव्हल्स कंपनीची बस डंपर ट्रकला धडकल्यानंतर पेटली. या भीषण अपघातात बसमधील 13 प्रवासी जिवंत जळाले.
मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात एक बस आणि ट्रकची आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास समोरासमोर टक्कर झाली. त्यात दोन्ही वाहनांच्या चालकांसह 9 जणांचा मृत्यू झाला.
बांगलादेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दाउलतदिया घाटावर मोठ्या नौकेवर चढवताना नदीत कोसळली. त्यात 26 जणांचा मृत्यू झाला.


























































