मुंबईत कोरोनाचे 5 रुग्ण 

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित असून आज दिवसभरात पाच रुग्ण सापडले. या पाचही जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. रुग्ण आणि अतिगंभीर रुग्णांसह मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसांत शून्यावर आले आहे. दिवसभरात सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन ती 48 वर पोहोचली आहे.