पाच वर्षांत महाराष्ट्रातील बहुतांश प्रश्न संपले,चंद्रकांत पाटील यांचा दावा

chandrakant patil bjp minister says maharashtra
कोथरुड-चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या साठ वर्षांत सुटले नाहीत, असे प्रश्न मार्गी लावले. मराठा, धनगर, ओबीसी आदी समाजाचे प्रश्न सोडविले असून गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील बहुतांश प्रश्न संपले असल्याचा दावा भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे झाला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना राज्यातील बहुतांश प्रश्न संपले आहेत. जे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी पुन्हा एकदा राज्यात मजबूत सरकार निवडून द्या, असे आवाहन केले.

फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. तसेच ओबीसी समाजासाठी केगळे मंत्रालय स्थापन केले. धनगर समाजाला आरक्षण देता आले नाही. मात्र त्यांच्यासाठी 22 योजना देऊन तब्बल एक हजार कोटींचे पॅकेज त्यांच्यासाठी देण्यात आले. तसेच या सरकारच्या काळात शेती व शेतकऱ्यांचे प्रश्नही प्रामुख्याने मार्गी लावण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

राज्यात गेल्या पाच वर्षात एकही दंगल झालेली नाही. पोलिसांच्या बंदुकीतून एकही गोळी सुटलेली नाही. महाराष्ट्रातील सर्व  जिह्यात जाऊन असा यशस्वी दौरा करणारे फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विरोधात भाजप हायकमांडकडे हायकमांडकडे एकही तक्रार गेली नाही, असे सांगत पाटील यांनी फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले.

210 की 250 जागा मिळतील याची प्रतिक्षा
महाराष्ट्रातील पाच वर्षाच्या सत्ताकाळात बहुतांश प्रश्न सरकारने सोडविले. त्यामुळे आगामी निकडणुकीत चांगल यश मिळेल. या निवडणुकीत 210 जागा की 250 जागा मिळतील इतकीच प्रतीक्षा असल्याचे भाजप प्रदेश अध्यक्ष पाटील म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या