ऑलिम्पिकसाठी पात्र खेळाडूंना 50 लाखांचा अतिरिक्त निधी,क्रीडामंत्री आशीष शेलार यांची घोषणा

258
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि मंत्री आशिष शेलार यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.

सामना ऑनलाईन, पुणे

ऑलम्पिकसाठी पात्र झालेल्या खेळाडूंना तयारीसाठी 50 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देणार. अशी घोषणा शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ऍड. आशीष शेलार यांनी सोमवारी पुण्यात केली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना व मार्गदर्शकांना रोख पारितोषिक वितरण सोहळा शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ऍड. आशीष शेलार यांच्या उपस्थितीत बालेवाडी येथे संपन्न झाला.

शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या क्रीडा व युवक कल्याण संचनालयातर्फे दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येते. यावर्षी 24 खेळाडू आणि16 प्रशिकांचा सन्मान करून एकूण 91 लाख रुपयांची बक्षिसे त्यांना देण्यात आली.यावेळी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सीबीएसई व आयसीएसई बोर्ड खेळाडूंचा सहभाग वादावर तोडगा काढू

शासनाच्या शालेय (डीएसओ) स्पर्धेमध्ये सीबीएससी व आयसीएसई बोर्डाच्या खेळाडूंच्या सहभागावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढू, असे आश्वासन क्रीडामंत्री आशीष शेलार यांनी दिले आहे. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी क्रीडामंत्री कल्याण येथे यासंदर्भात स्थापन झालेल्या संघर्ष समितीला भेटले. आमदार नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने क्रीडा मंत्र्यांसमोर हा मुद्दा मांडला. त्यावेळी शेलार म्हणाले की, आपला मुद्दा योग्य असून यावर शासनदरबारी दखल घेऊन आपल्या विषयाला योग्य तो न्याय दिला जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या