
अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बमुळे जगभरात चिंतेच वातावरण निर्माण झाले होते. तो तणाव निवळत असतानाच आता मेक्सिकोन टॅरिफ बॉम्ब फोडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा टॅरिफ युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने टॅरिफ वाढवून अनेक देशांना धक्का दिला आहे, तर आता मेक्सिको त्या तणावात भर पाडत आहे.
मेक्सिकोने एक मोठे पाऊल उचलत चीनसह अनेक आशियाई देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर उच्च कर (मेक्सिको ५०% टॅरिफ) लादले आहे. तेथील सिनेटने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हे नवीन दर पुढील वर्षी २०२६ पासून लागू होतील. ज्या देशांचा मेक्सिकोशी व्यापार करार नाही त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. मेक्सिकोने आता अमेरिकेचे अनुकरण करत टॅरिफ लादायला सुरुवात केली आहे. चीन आणि इतर आशियाई देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर ५०% पर्यंत टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव सिनेटने मंजूर केला आहे.
मेक्सिकोचे हे टॅरिफ दर पुढील वर्षी २०२६ पासून लागू होतील. या निर्णयामुळे चीन,हिंदुस्थान, दक्षिण कोरिया, थायलंड आणि इंडोनेशिया यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मेक्सिको या सर्व देशांमधून येणाऱ्या ऑटो पार्ट्स, कापड, स्टील आणि इतर वस्तूंवर ५०% पर्यंत टॅरिफ लादणार आहे. सिनेटमध्ये मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार, इतर अनेक वस्तूंवरील शुल्क देखील ३५% पर्यंत वाढवण्यात आले आहे.
अमेरिकेपाठोपाठ मेक्सिकोनेही स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी टॅरिफ वाढवण्याचे हे पाऊल उचलले आहे. मात्र, या टॅरिफ वाढीला व्यावसायिक गटांनी तीव्र विरोध केला आहे. मेक्सिकोची ही टॅरिफवाढ ही अमेरिकेला खूश करण्यासाठी आणि पुढील वर्षी $3.76 अब्ज अतिरिक्त महसूल निर्माण करण्यासाठी एक पाऊल आहे कारण मेक्सिको त्यांची वित्तीय तूट भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे, असे सांगण्यात येत आहे.



























































