दिल्ली जिंकण्यासाठी महाराष्ट्राचा कॅरम संघ सज्ज

राष्ट्रीय कॅरममध्ये आपला असलेला दबदबा पुन्हा एकदा दाखवत दिल्ली जिंकण्यासाठी महाराष्ट्राचा 12 सदस्यीय संघ सज्ज झाला आहे. येत्या 17 ते 21 मार्चदरम्यान दिल्लाच्या तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये 52 वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा खेळविली जाणार असून यात एकेरी-दुहेरी आणि सांघिक स्पर्धेत जोरदार कामगिरी करण्याचे ध्येय राज्याच्या पुरुष आणि महिला कॅरमपटूंनी डोळय़ांसमोर ठेवले आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी 14 मार्चदरम्यान तीन दिवसांचे सराव शिबीर दादरच्या एमसीए ट्रेनिंग सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे. 15 मार्चला महाराष्ट्राचा संघ राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना होणार असून त्यांचा सर्व खर्च  महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे.

पुरुष संघ 1) विकास धारिया, संजय मांडे, फहिम काझी ( सर्व मुंबई ) सागर वाघमारे ( पुणे ), पंकज पवार ( ठाणे ), रिझवान शेख (मुंबई उपनगर) आणि संजय देसाई (संघ व्यवस्थापक). महिला संघ मधुरा देवळे, चैताली सुवारी (ठाणे), केशर निर्गुण, दीक्षा चव्हाण (सिंधुदुर्ग), रिंकी कुमारी, सिमरन शिंदे  (मुंबई) आणि प्राची जोशी ( संघ व्यवस्थापक ).