मनमाडमध्ये एसटी बस आणि कंटेनरची धडक, 6 जणांचा मृत्यू

25
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, नाशिक

मनमाड शहराजवळ बाभडबारी घाडामध्ये झालेल्या भीषण अपघातात 6 जण मृत्यूमुखी पडले आहेत. एसटी आणि कंटेनरची धडक झाल्याने ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात 12 जण जखमी झले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देवळा-चांदवड मार्गावर हा अपघात झाला आहे. नंदुरबारहून नाशिकला जाणाऱ्या बसला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या