सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला, सात दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू कश्मीरमधील सांबा सेक्टरमधील सीमा भागातून हिंदुस्थानात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. सीमा सुरक्षा दलाने ही कारवाई केली आहे.

गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी सीमेवरून हिंदुस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीमा सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे समजते.