
तामीळनाडूतील मतदार फेरतपासणी प्रक्रिया (एसआयआर) पूर्ण झाली असून या प्रक्रियेत तब्बल 74 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
निवडणूक आयोगाने आज तामीळनाडूची अंतिम मतदार यादी जाहीर केली. एसआयआरच्या आधी तामीळनाडूत एकूण 6.41 कोटी मतदार होते. ती संख्या आता 5.67 कोटींवर आली आहे. यात 2.7 कोटी पुरुष, 2.8 कोटी महिला आणि 7617 हजार तृतीयपंथीयांचा समावेश आहे.
































































