चारधाम यात्रेत आतापर्यंत 74 भाविकांचा मृत्यू

उत्तराखंडच्या चारधाम यात्रेत आतापर्यंत 74 भाविकांचा म्त्यू झाला आहे. यातील 60 पेक्षा अधिक भाविकांना नैसर्गिक कारण आणि प्रकृती बिघडल्यामुळे प्राण गमवावा लागला. आठ भाविकांचा हेलिकॉप्टर दुर्घटना व इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चारधाम यात्रेत केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमनोत्री या चारधामचा समावेश होतो. 30 एप्रिलपासून चारही पवित्र धामची यात्रा सुरू झाली आहे.