भांडुप पश्चिम परिसरातील  75 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

मुंबई महानगरपालिकेच्या एस विभाग हद्दीतील भांडुप पश्चिम परिसरातील कक्कय्या शेट्टी मार्गावरील 75 अनधिकृत बांधकामे आज निष्कासित करण्यात आली आहेत. यामध्ये 62 घरे आणि 13 दुकानांचा समावेश आहे. या कारवाईमुळे हिंद रेक्टिफायर पंपनी ते कक्कय्या शेट्टी हा 3 मीटर अरुंद असलेला मार्ग आता 18.30 मीटर इतका रुंद झाला आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. उप आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एस विभागाचे सहायक आयुक्त भास्कर कसगीकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी दोन बुलडोझर, 2 जेसीबी, दोन इतर वाहने, 80 कामगार, 30 अभियंते, 15 पोलीस इतका फौजफाटा तैनात होता.