93वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन धाराशीवला

215

सामना ऑनलाईनस संभाजीनगर

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 93 वे मराठी साहित्य संमेलन यंदा मराठवाडय़ातील धाराशीव येथे घेण्याचा निर्णय झाल्याची घोषणा आज सोमवारी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराक ठाले-पाटील यांनी संभाजीनगरात केली. पाटील म्हणाले की, हे संमेलन 2020 च्या जानेवारीत धाराशीव येथे होईल. संमेलनाच्या निश्चित तारखा धाराशीवकरांशी चर्चा करून सर्वांच्या सोयीने ठरविता येतील.

चार ठिकाणच्या निमंत्रणातून धाराशीवची बाजी

संमेलनासाठी महामंडळाकडे धाराशीव, लातूर, नाशिक आणि विदर्भातील बुलढाण्याचे निमंत्रण आले होते. मात्र, मागील बैठकीतच बुलढाणा आणि लातूर वगळण्यात आले होते. त्यामुळे नाशिक की धाराशीव, अशी चढाओढ होती. साहित्य महामंडळ मराठवाडय़ाकडे असल्याने धाराशीवला पहिली पसंती मिळाली. या शहराचा प्राधान्याने विचार अपेक्षित असल्यामुळे मराठवाडय़ातील साहित्यविश्वात आनंद पसरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या