
सामना प्रतिनिधी । परभणी
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहिर झाला असून सर्व शाखांच्या नियमित विद्यार्थ्यांमध्ये जिल्ह्याचा निकाल ८९.९० टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. हा निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून आली.
बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व व्होकेशनल अभ्यासक्रमांसाठी २२ हजार ६६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर २० हजार ३०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची ही टक्केवारी ८९.९० टक्के आहे.
यंदा परभणी जिल्ह्यातून विज्ञान शाखेच्या १० हजार ६८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १० हजार ६६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर १० हजार ९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९४.६७ टक्के आहे. यामध्ये एक हजार ५८७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, पाच हजार ४०५ प्रथमश्रेणीमध्ये, तीन हजार ३४ द्वितीय श्रेणीत तर ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेच्या नऊ हजार ५०३ पैकी नऊ हजार ४५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर सात हजार ९७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ८४.३६ भरते. यामध्ये ८३४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, चार हजार ५३३ विद्यार्थ्यांनी प्रथमश्रेणी, दोन हजार ५२२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ८३ विद्यार्थी पास झाले. वाणिज्य शाखेच्या एक हजार ९९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर १ हजार ९९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक हजार ८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९१.९३ टक्के आहे. त्यापैकी २७९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ९११ प्रथमश्रेणी, ६०७ द्वितीय श्रेणीत तर ३६ विद्यार्थी पास झाले. व्होकेशनल अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिलेल्या ४७९ विद्यार्थ्यांकी ४०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ८४.५५ आहे.
राजे संभाजी विद्यालयाची यशाची परंपरा कायम
परभणी : तालुक्यातील तरोडा येथील राजे संभाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९८ टक्के तर कला शाखेचा ९३ टक्के लागला आहे. कला शाखेतून प्रथम गाडगे शितल देविदास ८१.६९ टक्के घेऊन बाजी मारली आहे. द्वितीयस्थानी कोमल गिराम ७८.३० टक्के, तृतिय मनिषा नरवाडे ७७.६९ तर विज्ञान शाखेतून प्रथम सायली सूयर्वंशी ६९.२३, द्वितीय शिवकन्या शेळके ६७.३८, तृतिय मोहिनी कदम ६६.७९. टक्के घेऊन यांनी मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे खासदार संजय जाधव, संस्थाध्यक्ष उदयदादा देशमुख, प्राचार्य दिगांबर मोरे व सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.
आदिती उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
जिंतूर : जिंतूर तालुक्यातील स्व. राधाबई वाहूळे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुऱ्हाडी अंतर्गत आदिती कला, वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय कुऱ्हाडी येथील इयत्ता बारावीचा निकाल १०० टक्के लागला.
येथील विद्यार्थी जीवन अशोक शोळंके यांनी विज्ञान शाखेत ७५ टक्के गुण मिळविले आहेत. तर कला शाखेत विष्णू ठोंबरे यांनी ६५ टक्के गुण मिळाले आहेत. वाणिज्य शाखेत मयूर कांबळे यांनी ६५ टके गुण घेऊन विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळाला आहे. आदिती विद्यालयाच्या वतीने पेâब्रुवारी-२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेत तीनही शाखा मिळूण एकूण २८ मुले बसविण्यात आले होते ते सर्वच विद्यार्थी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत त्यांचे अभिनंदन विद्यालयाचे प्राचार्य राहूल लक्ष्मण वाहुळे, संस्था सचिव प्रा.भारती पिराजी शेजावळे, संस्था अध्यक्ष लक्ष्मण वाहुळे, ग्रा.प. सदस्य कमलबाई वाहूळे, प्रा. मुरली पवार, प्रा. खुशाल घनसावंत,प्रा वृषाली इंझे, प्रा पंकज शेजावळे,चेरमान देविदास इंझे, शेषेराव इंजे आदींनी केले आहे.
मन्नथ महाविद्यालयाचे यश
परभणी : तालुक्यातील कारेगाव येथील श्री मन्नाथ कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा ९५.७३ टक्के निकाल लागला आहे. यात विज्ञान शाखा ९८.८८ टक्के तर कला शाखेचा ७७.४१ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेचे ५९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष निळोबा मुंडे, सचिव डॉ. नामदेव मुंडे, प्राचार्य अरविंद लटपटे, मुख्याध्यापक दिलीप गुट्टे, प्रा. अशोक राख यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
‘ज्ञानसाधना’ चे यश
परभणी : जिंतूर रोडवरील ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये विज्ञान शाखेतून प्रथम झाडे प्रणीता नागोराव ९० टक्के, द्वितीय भोंगाडे श्रुतीका विनय ८७.२३, तृतिय नागरे शरद सुधाकर ८५.२३ टक्के तर कला शाखेत प्रथम शेळके अर्चना विजय ८४.१५ टक्के, द्वितीय पारवे पूजा शिवाजी ८२.४६ टक्के, तृतिय दळवे अंजना रामकिशन ७८.४६ टक्के गुण घेऊन यश संपादन केले. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, सचिव शितल सोनटक्के, विभागप्रमुख आर.एस. चापेâ, पी.व्ही. कदम, एन.पी. खपरले, व्ही.डी. पत्की, एन.वाय. वाघ, आर.एम. राऊत आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
जोगवाडकर निवासी कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल
चारठाणा : कै. उत्तमराव जोगवाडकर निवासी कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. कला शाखेचा ४७ टक्के निकाल लागला आहे. चारठाणा येथील कै. उत्तमराव जोगवाडकर निवासी कनिष्ठ महाविद्यालय येथील विज्ञान शाखेमधून सर्वप्रथम श्रुती वाघ हिने ८२ टक्के गुण प्राप्त केले. तर द्वितीय पवन भुजंग कांदे ८० टक्के तसेच कला शाखेतून कॉलेजमधून प्रथम संदीप राठोड ७० टक्के, ज्योती भताने ७५ टक्के घेऊन यश संपादन केले. याबद्दल संस्थाअध्यक्ष शशिकांत देशपांडे, सचिव विजय कान्हेकर आणि प्राचार्य टी.बी. पालवे, प्रा. आर.के. घुगे यांनी अभिनंदन केले आहे.































































