
सामना प्रतिनिधी । मुंबई
कोकण रेल्वेने पावसाळय़ासाठी संपूर्ण दक्षता घेतली आहे. कोलाड ते ठोकूर या कोकण मार्गाच्या हद्दीत दिवसाचे २४ तास ७७० कर्मचाऱ्यांची पेट्रोलिंगसाठी नियुक्ती करण्यात आली असून दरडी कोसळण्याची शक्यता असणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणांवर वॉच ठेवण्यात आला असून माती खणून काढणाऱ्या जेसीबी आदी यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
– ‘जिओ सेफ्टी’ची कामे करण्यात आल्याने दरडी कोसळणे, जमीन धसण्यासारख्या घटनांची संख्या कमी कमी होत आली असल्याचे कोकण रेल्वेचे म्हणणे आहे.
– गेली पाच वर्षे दरडी कोसळल्याने कोकणच्या गाडय़ांची वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना घडली नसल्याचा दावा.
– ट्रेनच्या दोन्ही लेको पायलट आणि गार्डस्ना स्टेशन मास्तर आणि ट्रेन क्रूशी संपर्क साधण्यासाठी वॉकीटॉकी सेटस्ही पुरविण्यात आले आहेत.
– सर्व लोको पायलट, स्टेशन मास्तर, फिल्ड ऑफिसर सर्व विभागांच्या एक्झुक्युटिव्हज्ना मोबाईल.
वेगावर निर्बंध
कोकण रेल्वेचे १० जून ते ३१ ऑक्टोबरपासून मान्सून वेळापत्रकही लागू होणार असून काही ठिकाणी गाडय़ांच्या वेगावर निर्बंध ठेवण्यात आले आहेत. जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यास लोको पायलटना ताशी ४० किमीचा वेग ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


























































