विराट अनुष्काचा ‘हा’ व्हिडीओ पाहिलात का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या जोडीची नेहमीच चर्चा रंगलेली असते. आपल्या चाहत्यांसाठी ते नेहमीच त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. विराट आणि अनुष्का त्यांच्या कामात व्यस्त असल्याने फारच कमी वेळा कॅमेऱ्यासमोर एकत्र दिसतात. मात्र विराटने नुकताच अनुष्कासोबतचा जिम करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

Training together makes it even better! ♥♥♥ @anushkasharma

741.7k Likes, 9,439 Comments – Virat Kohli (@virat.kohli) on Instagram: “Training together makes it even better! ♥♥♥ @anushkasharma”

विराटने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये तो अनुष्का सोबतच जिममध्ये दिसत आहे. जवळपास ३० सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये अनुष्का वर्कआऊट करताना पाहायला मिळत आहे. यामध्ये विराटने अनुष्काची स्तुतीही केली आहे. विराटचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून आतापर्यंत जवळपास लाखो लोकांनी तो लाईक केला आहे. याआधीही विराटने अनुष्कासोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.