
सामना प्रतिनिधी । तेर
धाराशीव तालुक्यातील वाणेवाडी येथे आज दुपारी शेतीत काम करीत असताना वीज कोसळून दोन शेतमजूर महिला ठार तर अन्य तीन महिला जखमी झाल्याची घटना घडली.
धाराशिव तालुक्यातील वाणेवाडी येथे आज गुरुवारी, २१ जून रोजी दुपारी दिडच्या सुमारास शेतात काम करीत असताना वीज कोसळून शालुबाई पवार (५०) व शीतल घुटुकडे (३२) या दोन महिला जागीच ठार झाल्या तर अन्य शामल लहु सरवदे (४०), कौशल्या शेषेराव सरवदे (४५) व छाया भास्कर सरवदे (५०) या जखमी झाल्या आहेत.
जखमी महिलांना उपचारासाठी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत शालुबाई यांच्या पश्चात एक मुलगा व दोन विवाहित मुली तर शीतल घुटुकडे यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने वानेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.




























































