आरक्षणासाठी शर्टाच्या खिशावर संदेश लिहीत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिरदौस हुसैनी, अर्धापूर

काकासाहेब शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी स्वत:चे जीवन संपवले. त्यापाठोपाठ प्रल्हाद कल्याणकर यांनीही याच कारणासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. प्रल्हाद गुरुजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कल्याणकरांनी शर्टाच्या खिशावर संदेश लिहीत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे.  ‘मराठ्यांना आरक्षण दिलेच पाहीजे, मी प्रल्हाद गुरुजी बोलतोय, माझं शिक्षण बीए पर्यंत झालं आहे. मी वेडा किंवा अडाणी नाही’ असा संदेश त्यांनी खिशावर लिहला आहे.

कल्याणकर यांनी लिहलेली चिठ्ठीही सामना प्रतिनिधीच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीमध्ये कल्याणकर यांनी त्यांचे दु:ख मांडले आहे.

kalyankar-letter

या चिठ्ठीमध्ये कल्याणकर यांनी म्हटलंय की ‘माझ्या छातीत मराठ्याचं रक्त आहे आणि मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे निव्वळ आरक्षण न मिळाल्याने माझ्या मुलाला सरकारी नोकरी मिळाली नाही’ असं कल्याणकर यांनी त्यांच्या चिठ्ठीत लिहले आहे.