रोख रक्कम आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । नांदेड

हाताला चावा घेऊन पादचाऱ्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल चोरणाऱ्या दोन जणांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पकडले आहे.

ओंकारेश्वरनगर येथील नाथराव किशनराव केंद्रे हे शिवाजीनगर भागातल्या महात्मा फुले मार्केट येथे १२ ऑगस्ट २०१८  रोजी रात्री २ च्या सुमारास आले असतांना दोन अज्ञातांनी त्यांच्या हाताला चावा घेऊन आणि  मारहाण करून लुटले होते. त्यांच्याकडे असलेले रोख ८०० रूपये  आणि २ हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन चोरटे पळाले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी  दाखल झाला होता.

पोलीस उप निरीक्षक जी. ए.वाघमारे, पोलीस कर्मचारी शेख इब्राहिम, जमदाडे, मोरे, मोहन हाके, गायकवाड आणि कदम यांनी गुप्त माहितीच्या आधारे विष्णू रामजी गजभारे (४३) आणि प्रेमानंद  उर्फ बाळू उर्फ टूळकी ज्ञानोबा चौरंगे (३५) या आंबेडकरातील दोन चोरट्यांना पकडले. त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. पकडणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, यांनी अभिनंदन केले आहे.