नरभक्षक बिबट्यानं घेतला तरुणाचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाईन । घनसावंगी
जालना जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील राजेगावात बिबट्याने हल्ला करून अरुण अहिरे  या तरूणाचा बळी घेतला आहे. अरूण नेहमीप्रमाणे राजेगाव शिवारात गुरुवारी सकाळी शेतात जात असताना बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
राजेगाव शिवारात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याची वर्दळ असल्या बाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग अपयशी ठरल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गावाजवळच असलेल्या शिवारात बिबट्याने केलेल्या गंभीर हल्ल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे या नरभक्षक बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरीक करत आहेत.