साक्षीची फायनलमध्ये धडक, तर पूजा ढांडा कास्यपदकासाठी भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ऑलिम्पिक कास्यपदक विजेत्या हिंदुस्थानच्या साक्षी मलिकने बेलारूसमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली. दुसरीकडे हिंदुस्थानच्या पूजा ढांडाला उपांत्यपूर्व लढतीत हार पत्करावी लागली, मात्र तरीही तिला अजून कास्यपदक जिंकण्याची संधी आहे.

साक्षीने 62 किलो वजनी गटातील उपांत्य लढतीत अजरबैजानच्या एलमिरा गॅम्बारोवा हिचा 6-2 गुणफरकांनी पराभव करून फायनलमध्ये धडक दिली. आता सुवर्णपदकाच्या लढतीत तिच्यापुढे हंगेरीच्या मरियाना सॅस्टिनचे कडवे आव्हान असेल. पूजा ढांडाला 57 किलो गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत मंगोलियाच्या बॅटसेटसेज एलटँटसेटसेज हिचकडून 0-10 गुणांनी पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. मात्र तरीही पूजाला अजून कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल. कारण बॅटसेटसेजने अंतिम फेरी गाठल्याने पूजाला रेपीचेजची संधी मिळाली आहे. रेपीचेज राऊंडमध्ये पूजा अमेरिकेच्या बेका लेदर्स हिच्याशी भिडणार आहे.