
सामना ऑनलाईन, कटिहार
काँग्रेसने राफेल करारावरून नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरले असताना त्यांचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. राफेल प्रश्नाबाबत बोलत असताना पवार म्हणाले की मोदींच्या हेतूबद्दल जनतेच्या मनात शंका नाही. त्यांच्या या विधानामुळे नाराज झालेल्या तारीक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
NCP national general secretary Tariq Anwar quits the party, also resigns from the post of Lok Sabha MP. (File pic) pic.twitter.com/vX4ablr9fL
— ANI (@ANI) September 28, 2018
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसची अडचण झाली आहे. राफेल विमानांच्या खरेदीत घोटाळा झाला आहे असा आरोप करत काँग्रेसने सध्या रान उठवलं आहे. काँग्रेस याच मुद्दावरून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहे. एकेकाळी देशाचं संरक्षणमंत्रीपद भूषवलेल्या शरद पवार यांनी मोदींच्या हेतूबद्दल जनतेच्या मनात शंका नाही असं म्हटल्याने काँग्रेससमोर आता काय करावं असा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवार नेमकं काय म्हणाले ते ऐका
@narendramodi की मंशा पे शक नही किया जा सकता #sharadpawar#RafaleTruth #AyodhyaVerdict#ChirkutInChitrakoot#Adultery#Section497#AadhaarJudgmentpic.twitter.com/fMUVjW1N7Z
— AlkaSingh (@ThAlkaSingh) September 27, 2018
शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्फुरण चढलं आहे. त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या विधानाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. देशहिताला जपत पक्षीय राजकारणापलिकडे जात पवारांनी सत्य सांगितलं त्याबद्दल त्यांचे आभार अशा शब्दात शहा यांनी ट्वीट केलं आहे. याच ट्वीटमध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही खोचक टीका केली आहे.
I thank Shri @PawarSpeaks Ji, a former Defence Minister and veteran MP, for placing national interests above party politics and speaking the truth.
Dear @RahulGandhi, you would be wiser by believing your own ally and a leader of Pawar Saheb’s stature.
https://t.co/G1FHyeE2aC— Amit Shah (@AmitShah) September 27, 2018

























































