
सामना ऑनलाईन, दुबई
हिंदुस्थानी संघाने बांग्लादेशविरूद्धचा अंतिम सामना जिंकत आशिया चषक स्पर्धेवर आपले नाव कोरले. बांग्लादेशने पहिले फलंदाजी करताना सुरूवात चांगली केली, मात्र नंतर त्यांचे फलंदाज ढेपाळत गेली. हिंदुस्थानी संघाच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाने फलंदाजांची जामच पंचाईत झाली होती. लिटन दास आणि मोहम्मद मिथुन हे फलंदाजी करत असताना दासने ताकदवान फटका मारला होता. बॅटचा कडक आवाज ऐकल्यानंतर हा चेंडू सीमारेषेपलिकडे असे वाटत होते. मात्र त्याचवेळी रवींद्र जाडेजाने अफलातून डाईव्ह मारत हा बॉल अडवला. धोनी हे सगळं बघत होता, त्याने फलंदाज धावचीत होण्याची संधी ओळखली. काही सेकंदातच धोनीने चेंडू बॉलरच्या दिशेने फेकला तर फलंदाज बाद होईल हे ओळखलं आणि जाडेजा पडत असतानाच इशारा केला. त्याच्या इशाऱ्यानुसार जाडेजाने चेंडू गोलंदाजाच्या दिशेने फेकला आणि मोहम्मद मिथुन बाद झाला. ज्या पद्धतीने जाडेक्षण केलं त्याचं बरदस्त कौतुक केलं जातंय
— Kabali of Cricket (@KabaliOf) September 28, 2018



























































