सहलीला गेलेल्या चिमुरडीवर अतिप्रसंग, शाळेतल्याच मुलाने अत्याचार केल्याचं उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, बीड

शाळेच्या सहलीवर गेलेल्या ८ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. शहरातील एका शाळेची खंडेश्वरी परिसरात गेली होती. या सहलीसाठी गेलेल्या मुलीवर त्याच शाळेतल्या दुसऱ्या एका मुलाने अत्याचार केले आहे.  आरोपी हा १३ वर्षांचा असून त्याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने हे अत्याचार केले आहेत.

सहलीवरून जेव्हा ही मुलगी घरी आली तेव्हा तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. आपल्याला शाळेतल्याच मुलाने झोपडीत नेऊन घाणेरडे चाळे केल्याचं तिने सांगितलं. या कुटुंबाने तातडीने पोलिसांत धाव घेतली, मात्र गुन्हा दाखल करण्यास आणि शारीरिक तपासणीसाठी या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत होता. त्यांनी ही अडचण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुलूक यांच्या कानावर घातली. त्यांनी या कुटुंबाला धीर दिला आणि शारीरिक तपासणी पासून गुन्हा दाखल करेपर्यंत सगळी मदत केली.  शिवसैनिकांनी उग्र रुप धारण करताच पोलिसांची धावपळ झाली आणि त्यांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.