परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र. 8 कोळसा नसल्याने बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

कोळशाच्या कमतरतेमुळे परळी येथील नविन औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण 750 मेगावॉट क्षमता असलेल्या तीन संचापैकी एक संच बंद असून दोनच संच चालू आहेत. या दोन्ही संचातून दि.09 रोजी दुपारपर्यंत 397 मेगावॉट वीज निर्मिती झाली.मागील 9-10 दिवसांपासून 250 मेगावॉटचा संच कोळशाच्या कमतरतेमुळे बंद ठेवण्यात आल्याचे समजते.

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या खडका येथील तलावात जेमतेम एकच महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.गेल्या महिन्यात कोळशाअभावी संच क्रमांक 6 बंद ठेवण्यात आला होता. खडका येथील तलावात विद्युत निर्मिती साठी 1 महिना पुरेल एवढे पाणी जरी शिल्लक असले तरी.विद्युत केंद्रात मात्र 1 दिवस पुरेल एवढाच कोळसा असल्याची माहिती समोर आली आहे.