शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बीड दौऱ्याची जय्यत तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray

सामना प्रतिनिधी । बीड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 23 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या या दौऱ्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी सामनाशी बोलतांना सांगितले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 23 ऑक्टोबर रोजी बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या गटप्रमुख आणि बूथप्रमुखाचा मेळावा होत आहे. या गट प्रमुखांकडे त्याचे ओळखपत्र असणार आहे. प्रत्येकाला विशिष्ट कोड देण्यात आला आहे. संपर्क नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुधीर मोरे यांच्या देखरेखीत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे बीड मध्ये येत असल्याने शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. सात हजार लोक या मेळाव्याला उपस्थित राहतील. गटप्रमुख, बूथप्रमुख व्यतिरिक्त शिवसेनेचे शाखाप्रमुख, विभाग प्रमुख , शहरप्रमुख, उपप्रमुख, तालुकाप्रमुख , विविध अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत, अशी माहिती सुधीर मोरे यांनी दिली.