स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । मुंबई

चेंबूर येथे ‘स्पा’च्या नावाखाली सुरू असलेले सेक्स रॅकेट गुन्हे शाखेच्या युनिट-9 ने उद्ध्वस्त केले. यावेळी महिला मॅनेजर, स्पाचा मालक, 11 स्पा थेरेपिस्ट महिला आणि दोन ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

चेंबूर नाका येथील ‘रिनोव्हर स्पा’मध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची खबर युनिट-9 ला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सावंत, एपीआय आव्हाड, उपनिरीक्षक अम्बवडे, कोरे आणि पथकाने त्या स्पावर छापा मारला. घटनास्थळावरून ताब्यात घेतलेल्या मॅनेजर, स्पा थेरेपिस्ट महिला, ग्राहक यांना पुढील कारवाईकरिता चेंबूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.