जादुटोण्याच्या संशयावरून दुहेरी हत्याकांड ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । खेड

पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील औंढे येथे जादुटोण्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने वार करून दोघांची हत्या करण्यात आली आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशीच हे हत्याकांड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नावसू वाघमारे (55) आणि लिलाबाई मुकणे (48) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

नावसू आणि लिलाबाई हे दोघेही कोहिंडे गावात एकत्र राहत होते. ते दोघे जादूटोणा करत असल्याचा संशय कोहिंडे गावातील काहीजणांना होता. त्यावरूनच त्यांची हत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.