Video : यवतमाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांची भरदिवसा निर्घृण हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील भाजप कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. निलेश मस्के असे मृत भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. निलेश यांच्यावर आर्णी ग्रामीण रुग्णालयासमोर लोखंडी रॉडने हल्ला करून खून करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश हा केळापूर-आर्णीचे भाजप आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांच्या जवळचा कार्यकर्ता होता. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर भर चौकात निलेश यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोर संजय देठे या ठिकाणी बुलेटवरून आला होता. निलेशवर हल्लेखोराने रॉडने हल्ला चढवला. हल्ल्यानंतर आरोपी संजय बुलेट घटनास्थळी टाकून पसार झाला.

आरोपी संजय हा आर्णी तालुक्यातील म्हसोला येथील रहिवासी आहे. या घटनेने आर्णी येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे.