मध्य रेल्वेवर प्रवाशांची गर्दी वाढली! पाच वर्षांत आठ कोटी प्रवाशांची भर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वेवर उपनगरीय लोकलमध्ये गेल्या पाच वर्षांत आठ कोटी प्रवासी वाढले आहेत. दरवर्षी प्रवासी संख्येत मोठी भर पडल्याने पाच वर्षांत 154 लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. यंदा 2018 मध्ये मध्य रेल्वेवर 66 नवीन लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या. यामध्ये 40 फेऱ्या नेरूळ ते बेलापूर ते खारकोपर नवीन मार्गावर, तर उर्वरित लोकल फेऱ्या गोरेगाव हार्बर आणि काही मुख्य मार्गावर वाढविण्यात आलेल्या आहेत.

गेल्या पाच वर्षांतील प्रवासी व लोकल फेऱ्या

  • साल 2014 – 146 कोटी 80 लाख प्रवासी
  • रोजचे प्रवासी 40 लाख 21 हजार
  • एकूण फेऱ्यांची संख्या – 1,618
  • साल 2018 – 154 कोटी 70 लाख प्रवासी
  • रोजचे प्रवासी – 42 लाख 38 हजार
  • एकूण फेऱ्यांची संख्या – 1,772

गेल्या वर्षीच्या तुलनेत फेऱ्यांची संख्या

‘मरे’ मुख्य मार्ग

  • 2017 मध्ये 1,706 फेऱ्या
  • 2018 मध्ये 1,772 फेऱ्या

ट्रान्स हार्बर

  • 2017 मध्ये 246 फेऱ्या
  • 2018 मध्ये 262 फेऱ्या

हार्बर

  • 2017 मध्ये 604 फेऱ्या
  • 2018 मध्ये 614 फेऱ्या