
सामना प्रतिनिधी । नागपूर
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीसने) शुक्रवारी नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वेतून शस्त्रे घेऊन जाणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे दोन पिस्टल आणि २० राऊंड्स मिळाले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पथकाने नागपूर रेल्वे स्थानकांवर ही अटक केली.
आरोपींनी ही शस्त्रे बिहारमधून आणली असून ती नक्षलवाद्यांना पुरवण्यात येणार होती. याप्रकरणी आरोपींविरूद्ध ‘आर्म्स अॅक्ट’ आणि ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियमा’नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे आरोपी बरौनी-सिकंदराबाद जलदगती रेल्वेने बिहारवरून नागपूरला आले होते.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार उघडीस आल्याने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. एक आरोपी यवतमाळ जिल्हयाच्या वडगाव चा खाहिवासी आहे तर दुसरा बिहार मधील मुंगेरचा रहिवासी आहे, आरोपी हे शस्त्र कोणाला देनार होते याचा पोलिस तपास करीत आहे.


























































