झाडांच्या कत्तलीवरून हायकोर्टाने मेट्रोला खडसावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मेट्रोच्या कामासाठी एमएमआरसीएलकडून मुंबईतील वृक्षांची बेछूट कत्तल सुरूच आहे. यावरून हायकोर्टाने आज मेट्रो प्रशासनाला चांगलेच खडसावले. वृक्षांच्या देखभालीबाबत तुम्ही तत्पर का नाही? यापुढे असे आढळल्यास कोणतीही गय करणार नाही. अवमान याचिका दाखल करण्याचे आदेश देऊ, अशा शब्दांत हायकोर्टाने मेट्रो प्रशासनाला धारेवर धरले.

मेट्रोचे काम पाहणाऱया एमएमआरडीएकडून मेट्राच्या नावाखाली वृक्षांची कत्तल सुरूच आहे. याप्रकरणी नीना वर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मेट्रोच्या या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी हायकोर्टाने न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए. ए. सय्यद या न्यायमूर्तींची द्विसदस्यीय समिती नेमली आहे.

न्यायालयाचे आदेश

  • नवीन तसेच पुनर्रोपण केलेल्या झाडांचे जिओ टॅगिंग करा.
  • झाडांच्या देखभालीसाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करा.
  • झाडाच्या देखरेखीकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा.
  • झाडांच्या पुनर्रोपणाकरिता अद्ययावत मशीन वापरा.
  •  दिलेल्या आदेशांचे सहा आठवडय़ांत पालन करा.