स्वस्तात घराचे आमिष दाखवून तिघांना चुना,पुजाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

पूर्व उपनगरातील हायराईज टॉवरमध्ये स्वस्तात फ्लॅट मिळवून देतो असे सांगत तिघांना 81 लाखांचा चुना लावणाऱ्याला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. स्वतःला दलाल असल्याचे सांगून त्याने बनवाबनवी केली.

करसन पटेल असे आरोपीचे नाव आहे. घाटकोपरमध्ये राहणाऱ्या आणि एका मंदिरात पुजारीचे काम करणारा करसन आणि मितेश ठक्कर यांनी  स्वस्तात घराचे आमीष दाखवून जीतेंद्र गजर,अश्विन गजर यांच्याकडून 65 लाख तर तिसऱ्या व्यक्तीकडून 16 लाख घेतले होते. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी ठक्करला पोलिसांनी आधीच पकडले होते. त्यानंतर करसनला अटक केली आहे.