
सामना ऑनलाईन, मुंबई
1 मे. महाराष्ट्र दिन. मुंबईसह राज्याचा कानाकोपरा बुधवारी अखंड महाराष्ट्राच्या जयघोषाने दुमदुमणार आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी बलिदान देणाऱ्या 107 हुतात्म्यांच्या स्मृती जागवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात सरकारी तसेच खासगी पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम शिवाजी पार्क येथे सकाळी 8 वाजता होणार आहे. त्या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.






























































