‘अपोफिस’ आदळण्याचा धोका टळला! लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सुमारे दहा वर्षानंतर, 13 एप्रिल 2029, या दिवशी ‘अपोफिस’ नावाचा 340 मीटर आकाराचा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु हा लघुग्रह पृथ्वीवर न आदळता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त 31 हजार किलोमीटर अंतरावरून जाणार असल्याचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड बिनझेल यांनी सांगितलं आहे. ‘अपोफिस’ विषयी खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण म्हणाले, ‘अपोफिस’ हा लघुग्रह तीन शास्त्रज्ञांनी 19 जून 2004 रोजी अमेरिकेतील किटपीक वेधशाळेतून शोधला होता.

प्रथमपासूनच शास्त्रज्ञ त्याच्यावर नजर ठेवून होते. अधिक चैत्र कृष्ण अमावास्या, शुक्रवार 13 एप्रिल 2029 हा दिवस त्यादृष्टीने मोठय़ा ‘धोक्याचा दिवस’ समजला जात होता. कारण हा मोठा लघुग्रह या दिवशी पृथ्वीवर आदळण्याची शक्यताही निर्माण झाली होती. परंतु नवीन संशोधनाप्रमाणे हा आता ‘लकी दिवस’ ठरणार असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. कारण या दिवशी 340 मीटर आकाराचा हा अपोफिस लघुग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त 31 हजार किलोमीटर अंतरावरून जाणार असल्याने या लघुग्रहाचा अभ्यास करण्याची संधी शास्त्रज्ञांना मिळणार आहे.

डोळ्यांनी बघता येईल
अपोफिस म्हणजे खगोलप्रेमींना संधी असून 13 एप्रिल 2029 रोजी पृथ्वीच्या काही भागांतून हा लघुग्रह साध्या डोळ्यांनी बघता येईल.