
सामना प्रतिनिधी । नगर
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च मुदतीत सादर केला आहे. नगरमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले खासदार डॉ. सुजय विखे यांनी निवडणूक खर्चातही प्रतिस्पर्धी उमेदवारांना मागे टाकल्याचे चित्र आहे. तर शिर्डीत काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सर्वाधिक खर्च सादर केला आहे.
सुजय विखे यांनी 64 लाख 49 हजार 332 रुपये खर्च सादर केला आहे. तर भाऊसाहेब कांबळे यांनी 59 लाख 79 हजार 132 रुपये निवडणूक खर्च सादर केला आहे. दरम्यान, शिर्डी मतदारसंघातील विजयी उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी 59 लाख 73 हजार 183 रुपयांचा निवडणूक खर्च सादर केला आहे. त्या पाठोपाठ भाऊसाहेब वाकचौरे यांनी 28 लाख 12 हजार रुपये खर्च सादर केला आहे.
प्रत्येक उमेदवाराला 70 लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा आहे. केलेला खर्च सादर करण्यासाठी निवडणुकीचा निकाल लागल्यापासून तीस दिवसांची मुदत असते. त्यानुसार सर्वच उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला असल्याचे सांगण्यात आले.
नगर मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च
खा. डॉ. सुजय विखे : 64 लाख 49 हजार 332 रुपये
आ. संग्राम जगताप : 61 लाख 8 हजार 138 रुपये
नामदेव वाकळे : 1 लाख 55 हजार 689 रुपये
कलीराम पोपळघट : 25 हजार 800 रुपये
धीरज बताडे : 14 हजार 630 रुपये
सुधाकर आव्हाड : 3 लाख 53 हजार 421 रुपये
संजय सावंत : 44 हजार 450 रुपये
आप्पासाहेब पालवे : 25 हजार 800 रुपये
कमल सावंत : 4 लाख 41 हजार 449 रुपये
भास्कर पाटोळे : 1 लाख 2 हजार 532 रुपये
रामनाथ गोल्हार : 27 हजार 520 रुपये
शेख अबीद हुसेन : 1 लाख 40 हजार 68 रुपये
साईनाथ घोरपडे : 35 हजार 489 रुपये
संजीव भोर : 6 लाख 90 हजार 564 रुपये
संदीप सकट : 34 हजार 426 रुपये
श्रीधर दरेकर :50 हजार 115 रुपये
फारूख शेख : 28 हजार 300 रुपये
दत्तात्रेय वाघमोडे : 27 हजार रुपये
ज्ञानदेव सुपेकर : 1 लाख 15 हजार 445 रुपये
’शिर्डी’तील उमेदवारांचा निवडणूक खर्च
भाऊसाहेब कांबळे : 59 लाख 79 हजार 132
सदाशिव लोखंडे : 59 लाख 73 हजार 183
बन्सी सातपुते : 7 लाख 42 हजार 102
सुरेश जगधने : 4 लाख 39 हजार 431
संजय सुखदान : 14 लाख 46 हजार 186
अशोक जाधव : 1 लाख 77 हजार 907
प्रकाश आहेर : 2 लाख 93 हजार 533
विजय घाटे : 1 लाख 77 हजार 856
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे : 28 लाख 12 हजार 544
गोविंद अमोलिक : 14 हजार 470
अशोक वाकचौरे : 1 लाख 28 हजार 50
किशोर रोकडे : 17 हजार 79
गणपत मोरे : 38 हजार 787
प्रदीप सरोदे : 8 लाख 52 हजार 697
बापू रणधीर : 14 हजार 265
शंकर बोरगे : 29 हजार 262
भाऊसाहेब जयराम वाकचौरे : 17 हजार 272
सचिन गवांदे : 45 हजार 369
सुभाष त्रिभुवन : 79 हजार 628
संपत समिंदर : 30 हजार 701




























































