मालवणात विद्यार्थ्यांना गणवेश वितरण व वह्या वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या वतीने कृ. सि. देसाई शिक्षण मंडळ संचालित लक्ष्मीबाई देसाई टोपीवाला कन्याशाळा, मालवण येथील विद्यार्थ्यांना गणवेश वितरण व वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा गुरुमंत्र घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरू आहे. अनेक शाळांत आमदार निधीतून विविध गरजा पूर्ण केल्या जात आहेत. शेकडो शाळांत वह्या वाटप करण्यात आले आहे. गरजूंना छत्र्या वाटप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना अल्प किमतीत ताडपत्री दिली जात आहे. विकासकामांबरोबर जनतेची सेवा अशीच करत राहू. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शाळांच्या शैक्षणिक गरजाही पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले.

यावेळी, मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालकर माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकप्रमुख गणेश कुडाळकर, नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, श्वेता सावंत, अंजना सामंत, दीपा शिंदे, नंदा सारंग, रश्मी परुळेकर, विद्या फर्नांडिस, पूजा तळाशीकर, पूजा तोंडवळकर, पल्लवी पारकर, किसन मांजरेकर, आंतोन फर्नांडिस, महेश मेस्त्री, दत्तात्रय नेरकर, नीलम शिंदे, वराडकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व वह्या वाटप केल्याबद्दल मुख्याद्यापक लक्ष्मण शिंदे शिक्षक प्रवीण साबळे, सौ श्वेता राळकर, सौ वैशाली चव्हाण, नूतन राऊळ, सौ पाटणकर यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले.