
फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये होणाऱ्या दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत बारावीची तर 3 ते 23 मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक http://www.mahahsscboard.in/ या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. वेबसाइटवरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी शाळा-कॉलेजमधून मिळणारे छापील वेळापत्रकच अंतिम असेल. या वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.























































