
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून या निवडणुकीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची मुले म्हणजेच धीरज तसेच अमित देशमुख हे विजयी झाले आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक ट्वीट केलं आहे. आडनाव जरी मराठी असलं तरी ज्योतिरादित्य यांना मराठी नीट लिहिता येत नाही. तरीही मराठीतून देशमुख बंधूंचे मराठीतून अभिनंदन करण्याचा शिंदे यांनी अट्टहास केला. त्यासाठी बहुधा त्यांनी गुगल ट्रान्सलेटरचा आधार घेतला, मात्र त्यानंतर जे काही झाले ते भयानक होते. त्यांनी ट्वीट काय केले होते ते आधी पाहुयात
अमित आणि धीरज यांचे अभिनंदन! तुमच्या दोघींबरोबर लातूरमध्ये प्रचार करुन मला खूप आनंद झाला! आज आपण दोघांनीही आई-वडिलांचा अभिमान बाळला आहे – एक पात्र लोकांच्या योद्धाची योग्य मुले! पुढे आणि पुढे! जय महाराष्ट्र! #MaharashtraAssemblyPolls2019 @AmitV_Deshmukh @MeDeshmukh
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) October 24, 2019
या ट्वीटच्या पहिल्या वाक्यामध्ये शिंदे यांनी धीरज आणि अमित देशमुख यांचा उल्लेख करताना पुल्लिंगाच्या जागी स्त्रीलिंग करून टाकलं आहे. शेवटच्या वाक्याबाबत बोलायचे झाले तर ते वाचून ‘अरे कहना क्या चाहते हो!’ असा वाचकांना प्रश्न पडला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे हे ट्वीट पाहिल्यानंतर काहींनी मराठीतून ट्वीट केल्याबद्दल कौतुक केले.
आपले ही अभिनंदन! आपला मराठीतून बोलण्याचा व लिहिण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. चुका क्षम्य! ( ‘तुमच्या दोघांबरोबर’ असे लिहायला हवे.)
— Sharvari A. Joshi (@sharvarijoshi10) October 24, 2019
तर उत्तम मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनी शिंदे यांना झोडपून काढले. मराठी भाषा अशी लिहित असाल तर तुम्हाला ट्रोल करतील लोकं, असा सल्लाही एका ट्विटर वापरणाऱ्याने दिला आहे.
ओ काका, @JM_Scindia गूगल ट्रान्स्लेट नका हो वापरू! त्रास होतो. ‘Capable children of a deserving people’s warrior’ असं म्हणायचंय का तुम्हाला? ‘एक पात्र लोकांच्या योद्धाची योग्य मुले! पुढे आणि पुढे!’ हे फार विनोदी आहे.
— Shefali Vaidya ஷெஃபாலி வைத்யா शेफाली वैद्य (@ShefVaidya) October 25, 2019
कृपा करून अमित आणि धीरज कडून लिहून घ्या, पण अशा चूका करू नका सर
— Chintamani Gogate (@crgogate) October 25, 2019
मराठीत tweet करायच्या अगोदर कुण्या मराठी मित्राला दाखवायला हवा होता.
— Sujit Kawale (@sujit_kawale) October 25, 2019
ही कोणती भाषा आहे? मराठीत लिहा. शिंदे घराण्याचे वंशज आहात तुम्ही.
— Sandeep Parkhi (@sparkhi) October 25, 2019
दोघींनाही नका ओ #महाराज
दोघांनाही करा नाहीतर
ट्रोल करतील ते तुम्हाला
Plzzzzzz— Govind shejule patil (@govindshejule1) October 24, 2019
मराठीत tweet करायच्या अगोदर कुण्या मराठी मित्राला दाखवायला हवा होता.
— Sujit Kawale (@sujit_kawale) October 25, 2019
ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठीतून ट्वीट करण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पदच म्हणावा लागेल. मात्र जसं ट्विटर वापरणाऱ्यांनी सुचविले आहे तसे त्यांनी मराठीची उत्तम जाण असलेल्यांना हे ट्वीट दाखवणे गरजेचे होते किंवा त्यांच्याकडून लिहून घेणे अपेक्षित होते. असे न करता त्यांनी गुगल ट्रान्सलेटरचा आधार घेतला असावा ज्यामुळे त्यांची फजिती झाली आहे.



























































