
पोदार शिक्षण समूहाची नऊ दशकांची उज्ज्वल परंपरा आहे. आधुनिक युगामध्ये या समूहाने कालानुरुप बदल घडवत विद्यार्थ्यांच्या वाढत्या गरजा सातत्याने भागवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र असं करत करताना संस्थेने प्रामाणिकपणा, सचोटी आणि सेवाभावाचा त्याग केलेला नाही हे विशेष म्हणावे लागेल आणि याच तीन गोष्टी संस्थेचे मुख्य आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे हा या संस्थेचा एकमेव ध्यास आहे. समूहाचा महत्वाचा भाग असलेले शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या बौद्धीक वाढीसोबतच सामाजिक, नैतिक आणि भावनिक वाढीसाठी म्हणजेच सर्वांगीण वाढीसाठी प्रयत्नशील असतात.
पोदार शिक्षण समूहामध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि पालक एकसंधपणे वाटचालीमध्ये आपली शैक्षणिक उद्दीष्ट्ये गाठण्याचा प्रयत्न करत असतात. आजमितीला पोदार शिक्षण समूहाच्या देशभरात 131 शाळा असून त्यामध्ये 7600 कर्मचारी आणि 1 लाख 60 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 21 व्या शतकातील आव्हानांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे पोदार समूहाचे लक्ष्य आहे.
पोदार शिक्षण समूहाची उज्ज्वल परंपरा असून 9 दशके या समुहाने स्वत:ला शिक्षण सेवेसाठी स्वत:ला अर्पण केले आहे. पोदार समूहाने शिक्षण हे ध्येय आणि गुणवत्ता ही समाजाप्रती असलेली बांधिलकी असल्याचं निश्चय करुन आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. पोदार शिक्षण समूहाच्या शाळांमध्ये संपूर्ण देशात 1,60,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांचे भविष्यातील कारकीर्द उत्तम घडावी यासाठी पाया तयार करून देण्याचे काम हा शिक्षण समूह करत आलेला आहे. या देशाला अभिमान वाटावा असे नागरीक घडवण्याचा पोदार शिक्षण समूह सातत्याने प्रयत्न करत आलेला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सुशिक्षित करण्यासोबतच त्यांच्यामध्ये मूल्ये रुजवणे गरजेचे असून हे आपले काम नसून जबाबदारी आहे अशी पोदार शिक्षण समूहाची भूमिका आहे.
विद्यार्थी स्वयंपूर्ण व्हावा यासाठी पोदार शिक्षण समूहाने विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून शिक्षण देण्यास सुरुवात केली. यासाठी जगातील सर्वोत्तम शिक्षण पद्धतींचा अवलंब करण्यात आला. यामुळे आजच्या घडीला पोदार शिक्षण समूहातील शाळा या आधुनिक साधनांच्या सहाय्याने विद्यार्थी घडवण्याचे काम करत असतात. जे-जे सर्वोत्तम आहे ते-ते विद्यार्थ्यांना मिळायलाच पाहिजे असा या शिक्षण समूहाचा आग्रह राहिलेला आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, बारकाईने अभ्यास करून तयार केलेला अभ्यासक्रम, सर्वोत्तम शिक्षक, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. शिक्षण समूहाच्या अथक प्रयत्नांमुळे इथून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी हे स्वत:सोबतच शाळेचे आणि पोदार शिक्षण समूहाचे नावही उंचावताना दिसतात. या यशस्वी विद्यार्थ्यांमुळे पोदार समूहाने शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतल्याचे आज पाहायला मिळत आहे.
पोदार शिक्षण समूहाची मुहुर्तमेढ मुंबईतील सांताक्रूझ येथे 1927 साली रोवली गेली होती. 2004 साली या समूहाने नाशिकमध्ये शाळा सुरू केली आणि 2009 साली सीमोल्लंघन करत कर्नाटकमध्येही शाळा सुरु केली. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार,पंजाब या राज्यांमध्येही समूहाच्या शाळा सुरू झाल्या. 2015 साली या समूहाचे दुबईमध्ये प्री-स्कूल सुरू झाले. आजमितीला या समूहाच्या 9 राज्यांमध्ये शाळा सुरू आहेत.























































