
सन मराठी या वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘शाब्बास सूनबाई’ या मालिकेतील संजीवनीला (अभिनेत्री रश्मी अनपट) तिच्या स्वप्नांसाठी खऱया अर्थाने लग>ानंतर संघर्ष करावा लागणार आहे. ध्यानीमनी नसताना नाशिकच्या प्रतिष्ठत येवलेकर कुटुंबात लग्न झालेल्या संजीवनीसाठी सगळी चक्रे लग्नानंतर फिरली. तिच्या या लग्नाच्या निमित्ताने संजीवनीच्या भेटीला एक खास पाहुणी येत आहे. ती पाहुणी म्हणजे मृण्मयी देशपांडे.
संजीवनीची गोष्ट आता संघर्षाच्या वाटेवर असून मालिकेत तिच्या लग्नाची तयारी जय्यत झालेली आहे. या लग्नसोहळय़ात मृण्मयी देशपांडे नाचणारसुद्धा आहे. ‘शाब्बास सूनबाई’ म्हणणाऱया अप्पा येवलेकरांचा संजीवनीला सून करण्यामागे नेमका काय हेतू आहे? अप्पासाहेब खरोखरच महिला सबलीकरणाचे खंदे पुरस्कर्ते आहेत की त्यांच्या रूपात संजीवनीच्या आयुष्यात एका खलनायकाचा प्रवेश होऊ लागलाय? या प्रश्नांची उत्तरे आगामी भागात मिळतील.



























































